पनवेल हे शहर कुलाबा जिल्ह्यांत मुंबई पुणे रस्त्यावर,मुंबई पासुन ४४ मैलांवर असुन त्याचे भौगोलिक स्थान उत्तर अक्षांश १८.५८ व पूर्व रेखांश ७३.१२ वर आहे. नगरपालिकेचे स्थापनेपासून नगरपालिकेची हद्द ठरलेली नसुन,या हद्दीत तक्का,पोदी,कसबा,यांचा समावेश होतो असा उल्लेख सन १८८१-८२ चे ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्टमध्ये आढळतो. यानंतर शहराची वाढ होऊन त्याची मर्यादा व क्षेत्रफ़ळ खाली दिलेल्या नोटिफ़िकेशन नंबरने वाढलेले आहे. यामधुन सन १९४३ मध्ये गर्व्हमेंट नोटिफ़िकेशन नं.३०९०/३३ ता. २८-३-४३ ने पोदी हा भाग नगरपालिकेच्या हद्दींततून वगळण्यात आला.
या शहराचे हल्लीचे क्षेत्रफ़ळ २.०३ स्क्वे. मैल असुन शहराची हद्द उत्तरेस सर्व्हे नं ४८७,४८८,(RAMAGAR) ४८९, ४९१,७४२, ७३९, ७३८, ७२९ मुंबई पुणे न्यू डायव्हर्शन रोड. सर्व्हे नं ५१, ५५, ५४, ५३, व २१४, दक्षिणेस खाडी, पूर्वेस सर्व्हे नं २१७, २४३, २५७, २५६, २५५, ८२४ दुंदाळे तलाव, स. न. ३१६, ३१५, ३१४, ३१०, ३११, ३०९, ३३६, ३४६, ३४५, ३४४, ३४३, ३७४, ३७३, ३८१, ३८०, ३७९ व ३७८. पश्चिमेस खाडीची पूर्व हद्द व स.न.८४५ ची दक्षिण व पूर्व हद्द अशी आहे.
फ़ार पुरातन कळापासुन या शहराचे विशिष्ट भागाकरिता वेगवेगळी नावे असुन, त्यामागे प्राचीन इतिहास आहे. ती नावे अशी :- (१) बल्लाळेश्वर पाडा (२) लोखंडी पाडा (३) परदेशी आळी (४) जाखमाता पाडा (५) बांधवडा पाडा (६) प्रभु आळी (७) लाईन आळी (८) घाटे आळी (९) सुभेदार आळी (१०) देशमुख आळी (११) गोडसे आळी (१२) भुसार मोहोल्ला (१३) खारट पाडा (१४) खर्डीचा पाडा (१५) पाडा मोहोल्ला (१६) कच्छी मोहोल्ला (१७) पाटील मोहोल्ला (१८) वाजे मोहोल्ला (१९) बागवान मोहोल्ला (२०) कोळी वाडा (२१) हरिजन वाडा (२२) कुंभार वाडा (२३) तक्का (२४) मोमीन वाडा (२५) केतकी पाडा.
No comments:
Post a Comment