Search Engine


Sunday, June 17, 2007

पनवेल हे सात वॉर्डांमध्ये विभागलेले आहे. त्यांमध्ये कोणकोणत्या विभागांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे -

१) वोर्ड क्र. १ :- १) भुसार मोहोल्ला २) खारट पाडा उत्तर ३) खर्डीचा पाडा उत्तर व दक्षिण ४) म्युनिसिपल ठाणा नाका रोड.
२) वोर्ड क्र. २ :- १) पाटील मोहोल्ला २) वाजे मोहोल्ला ३) कोळी वाडा ४) केतकी पाड्यामधील काही भाग ५) पांजरापोळ गल्ली
३) वोर्ड क्र. ३ :- १) हरिजन वाडा २) मोमिजन पाडा ३) तक्का
४) वोर्ड क्र. ४ :- १) बांधवडा आळी २) लैन आळी ३) सुभेदार आळी ४) घाटे आळी
५) वोर्ड क्र. ५ :- १) लोखंडी पाडा काही भाग २) बल्लाळेश्वर पाडा ३) जाखमाता पाडा
६) वोर्ड क्र. ६ :- १) जोशी आळी २) देशमुख आळी ३) बल्लाळेश्वर पाड्याचा काही भाग ४) उत्तर भुसार मोहोल्ला काही भाग
७) वोर्ड क्र. ७ :- १) उत्तर भुसार मोहोल्ला काही भाग २) दक्षिण भुसार मोहोल्ला काही भाग ३) केतकी पाडा काही भाग ४) खारट पाडा दक्षिण भाग

पनवेलच्या नावाची निर्मिती

फार काळापूर्वी आत्ताच्या पनवेलच्या परिसरात 'नाग' लोकांचे राज्य होते, त्या काळी पनवेलला 'पवनपल्ली' असे संबोधत असत. इतिहास कळात अनेक ठिकाणी पर्णवेला, पानवेला व पानवेल अशा अनेक नावांनी पनवेलला संबोधत असत. यादवांच्या काळात पनवेलला असलेल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे. त्या वेळी देवगिरीच्या रामराजा यादवाचे अधिकारी ह्या गावाची काहीतरी नोंद करायला हवी म्हणून, 'पनवेल' हे समुद्राच्या काठावरचे व्यापार करणारे गाव म्हणून याला 'पण्यवेला' असे संबोधत असत. ह्या नावात दोन पदे आहेत, पहिले- 'पण्य' या शब्दाचा अर्थ 'विक्री करण्याचे' असा आहे. तर दुसरे पद- 'वेला' याचा अर्थ 'किनारा' किंवा 'ज्या वेळेला भरतीचे पाणी किनाऱ्याला लागते ती हद्द' असा आहे. थोडक्यात 'बंदर' असा आहे. काही काळातच ह्या गावाच नाव बदलून 'पनवेल' असे झाले.
त्याच प्रमाणे 'पनवेल' हे नाव एका तांदळाच्या जातीचे सुद्धा आहे. एके काळी ह्या गावात तांदळाचा फार मोठा व्यापार चालात असे, म्हणून तांदळाच्या एका जातीला पनवेल हे नाव पडले.

पनवेलच्या वेशी

पनवेल हे शहर कुलाबा जिल्ह्यांत मुंबई पुणे रस्त्यावर,मुंबई पासुन ४४ मैलांवर असुन त्याचे भौगोलिक स्थान उत्तर अक्षांश १८.५८ व पूर्व रेखांश ७३.१२ वर आहे. नगरपालिकेचे स्थापनेपासून नगरपालिकेची हद्द ठरलेली नसुन,या हद्दीत तक्का,पोदी,कसबा,यांचा समावेश होतो असा उल्लेख सन १८८१-८२ चे ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्टमध्ये आढळतो. यानंतर शहराची वाढ होऊन त्याची मर्यादा व क्षेत्रफ़ळ खाली दिलेल्या नोटिफ़िकेशन नंबरने वाढलेले आहे. यामधुन सन १९४३ मध्ये गर्व्हमेंट नोटिफ़िकेशन नं.३०९०/३३ ता. २८-३-४३ ने पोदी हा भाग नगरपालिकेच्या हद्दींततून वगळण्यात आला.
या शहराचे हल्लीचे क्षेत्रफ़ळ २.०३ स्क्वे. मैल असुन शहराची हद्द उत्तरेस सर्व्हे नं ४८७,४८८,(RAMAGAR) ४८९, ४९१,७४२, ७३९, ७३८, ७२९ मुंबई पुणे न्यू डायव्हर्शन रोड. सर्व्हे नं ५१, ५५, ५४, ५३, व २१४, दक्षिणेस खाडी, पूर्वेस सर्व्हे नं २१७, २४३, २५७, २५६, २५५, ८२४ दुंदाळे तलाव, स. न. ३१६, ३१५, ३१४, ३१०, ३११, ३०९, ३३६, ३४६, ३४५, ३४४, ३४३, ३७४, ३७३, ३८१, ३८०, ३७९ व ३७८. पश्चिमेस खाडीची पूर्व हद्द व स.न.८४५ ची दक्षिण व पूर्व हद्द अशी आहे.
फ़ार पुरातन कळापासुन या शहराचे विशिष्ट भागाकरिता वेगवेगळी नावे असुन, त्यामागे प्राचीन इतिहास आहे. ती नावे अशी :- (१) बल्लाळेश्वर पाडा (२) लोखंडी पाडा (३) परदेशी आळी (४) जाखमाता पाडा (५) बांधवडा पाडा (६) प्रभु आळी (७) लाईन आळी (८) घाटे आळी (९) सुभेदार आळी (१०) देशमुख आळी (११) गोडसे आळी (१२) भुसार मोहोल्ला (१३) खारट पाडा (१४) खर्डीचा पाडा (१५) पाडा मोहोल्ला (१६) कच्छी मोहोल्ला (१७) पाटील मोहोल्ला (१८) वाजे मोहोल्ला (१९) बागवान मोहोल्ला (२०) कोळी वाडा (२१) हरिजन वाडा (२२) कुंभार वाडा (२३) तक्का (२४) मोमीन वाडा (२५) केतकी पाडा.

पनवेलचे भौगोलिक स्थान

उत्तर अक्षांश १८.५८', पूर्व रेखांश ७३.१२' वर वसलेले आणि बौद्ध कालापासून सर्वश्रुत असलेले पनवेल शहर सुमारे ८००-८५० वर्षापासून कोकणप्रांतातील,शुर्पारक भागातील किंवा उत्तर कोकणातील एक प्रमुख शहर म्हणून गणले जाते.याचे कारण म्हणजे,या शहराला लाभलेली त्याची अशा भौगोलिक वैशिष्टयांविषयी माहिती देत आहोत.पनवेलच्या पुर्व दिशेस उंच पर्वतात उगम पावणारी 'गाढी नदी' ज्या ठिकणी अरबी समुद्रास मिळते त्याच ठिकाणी वसलेले गाव म्हणजेच 'पनवेल' होय. जेथे गाढी नदी अरबी समुद्राला मिळते,तेथे पनवेल बंदर विकसित झले आहे.भारताचा पश्चिम किनारा दंतुर असल्याने व पनवेल बंदर मोठ्या समुद्रा पासुन फ़ार आत असल्याने ते वादळांपासुन सुरक्षित असल्याने ह्या बंदराचा पुर्वी मोठ्या प्रमाणात विकास झाला.