फार काळापूर्वी आत्ताच्या पनवेलच्या परिसरात 'नाग' लोकांचे राज्य होते, त्या काळी पनवेलला 'पवनपल्ली' असे संबोधत असत. इतिहास कळात अनेक ठिकाणी पर्णवेला, पानवेला व पानवेल अशा अनेक नावांनी पनवेलला संबोधत असत. यादवांच्या काळात पनवेलला असलेल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे. त्या वेळी देवगिरीच्या रामराजा यादवाचे अधिकारी ह्या गावाची काहीतरी नोंद करायला हवी म्हणून, 'पनवेल' हे समुद्राच्या काठावरचे व्यापार करणारे गाव म्हणून याला 'पण्यवेला' असे संबोधत असत. ह्या नावात दोन पदे आहेत, पहिले- 'पण्य' या शब्दाचा अर्थ 'विक्री करण्याचे' असा आहे. तर दुसरे पद- 'वेला' याचा अर्थ 'किनारा' किंवा 'ज्या वेळेला भरतीचे पाणी किनाऱ्याला लागते ती हद्द' असा आहे. थोडक्यात 'बंदर' असा आहे. काही काळातच ह्या गावाच नाव बदलून 'पनवेल' असे झाले.
त्याच प्रमाणे 'पनवेल' हे नाव एका तांदळाच्या जातीचे सुद्धा आहे. एके काळी ह्या गावात तांदळाचा फार मोठा व्यापार चालात असे, म्हणून तांदळाच्या एका जातीला पनवेल हे नाव पडले.
No comments:
Post a Comment